चंदीगढ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांची थकबाकी तीन हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीनंतर पंजाबचे कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना धालीवाल यांनी सांगितले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीत. आणि यातील १०० कोटी रुपये ३० जुलैपर्यंत देण्यात येतील. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी दुसरा तर १५ सप्टेंबर रोजी तिसरा समान हप्ता जमा केला जाईल.
मंत्री धालीवाल यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले की, खासगी साखर कारखान्यांच्या मालकांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देण्यास सांगितले जाईल. आणि पैसे, थकबाकी न देणारा कारखाना बंद केला जाईल. सरकारने फगवाडा येथिल एका साखर कारखान्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारखान्याने गेल्या तीन हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ७६ कोटी रुपये थकवले आहेत.