पंजाब : साखर कारखाना कर्मचाऱ्यांची थकीत वेतनाची मागणी

फाजिल्का : आर्थिक संकटामुळे फाजिल्का सेंट्रल को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्सच्या कर्मचाऱ्यांना गेल्या ११ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे गेले अनेक महिने आर्थिक तणाव सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यासंदर्भात Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे आणि जे कर्मचारी मृत झाले आहेत, अशांच्या कुटुंबीयांची देणे-बाकी जानेवारी २०२० पासून प्रलंबीत ठेवली आहे. कारखान्याकडे वेतन आणि इतर थकबाकी असे ११ कोटी रुपये प्रलंबित आहेत. साखर कारखाना कामगार संघाच्या नेत्यांनी दिवाळी काही दिवसांवर येऊन पोहोचल्याने त्वरीत पगार द्यावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, याबाबात कारखान्याचे महा व्यवस्थापक कंवलजित सिंह यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here