चंदीगढ: राज्य सरकारने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेशन धान्य बॅगांचे वितरण सुरू केले आहे, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिली. सद्यस्थितीत एक लाख बॅगा तयार आहेत. जर गरज भासली तर आणखी बॅग सरकार तयार करेल, असे मुख्यमंत्री सिंह म्हणाले.
आम्ही रेशन धान्याच्या बॅगांचे वितरण सुरू केले आहे. यामध्ये १० किलो गव्हाचे पीठ, दोन किलो साखर आणि दोन किलो डाळ यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली. सद्यस्थितीत एक लाख बॅगा तयार आहेत. गरज भासल्यास आणखी बॅगा तयार केल्या जातील. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि घरीच थांबावे असे आवाहन त्यांनी केले.
पंजाबमध्ये कोरोना विषाणूचे ५३,४२६ सक्रिय रुग्ण आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ८,७७२ जणांचा मृत्यू झाला आहे.