पंजाब: ऊस थकबाकी बाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजी

नकोदर, पंजाब: नकोदर सहकारी साखर कारखान्याकडून 2018-2019 च्या हंगामातील 13.64 करोड रुपयांपेक्षा अधिक थकबाकी भागवण्याबाबत नकोदर, शाहकोट आणि फिल्लौर येथील ऊस शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. प्रलंबित थकबाकीमुळे प्रभावित झालेल्या शेतकर्‍यांनी आरोप केला की, कारखाना व्यवस्थापनामुळे ऊस शेतकर्‍यांना थकबाकी देण्यात विलंब होत आहे. शेतकर्‍यांच्या प्रलंबित थकबाकी भागवण्याबाबत नोव्हेंबर 2018 पासून आतापर्यंत अनेकदा कारखान्यात खेटे मारले, पण त्यांना थकबाकी भागवलेली नाही. शेतकर्‍यांनी आरोप केला की, कारखान्याचे निदेशक आणि इतर अधिक़ारीही त्यांच्या समस्या समजून घेवून त्या सोडवण्यास तयार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here