पंजाब: ऊस दरात वाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने

गुरदासपूर : शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे जबरदस्तीने सुरू असलेल्या अधिग्रहणाविरोधात आणि उसाच्या किमान समर्थन मूल्याच्या मागणीसाठी तीन तास बटाला रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे रुळावर धरणे आंदोलन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात पंजाबमधील १२ जिल्ह्यांमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले असा दावा शेतकऱ्यांनी केला. शेतकरी कामगार संघर्ष समितीने (केएमसएससी) सांगितले की, शेतकऱ्यांनी दिल्ली-कटरा एक्स्प्रेस महामार्ग आणि बटाला महामार्गाच्या निर्मितीस विरोध केला आहे. गुरदासपूर आणि होशियारपूरच्या शेतकऱ्यांनी आपल्या उसाला दर आणि आपल्या जमिनींबाबत आंदोलन केले.

शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या प्रतिनिधीने एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने आमच्या उसाची बिले दिली पाहिजेत. आतापर्यंत आम्हाला काहीच पैसे मिळालेले नाहीत. आणि आता ५० दिवसांहून अधिक काळ उलटला आहे. राज्य सरकारने ३८० रुपये प्रती क्विंटल दर निश्चित केल्याची घोषणा केली होती. आतापर्यंत हा दर आम्हाला मिळालेले नाही. बटाला रेल्वे स्टेशनच्या शेतकऱ्यांनी आरोप केला की, भारतमाला योजनेअंतर्गत महामार्ग निर्मितीसाठी त्यांच्या जमिनींचे जबरदस्तीने अधिग्रहण केले जात आहे. त्याची नुकसान भरपाई दिली गेलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here