पंजाब : शेतकऱ्यांना ऊसासोबतह इतर बहुपर्यायी पिकांची पद्धती स्वीकारणाचे आवाहन

करतारपूर : शेतकर्‍यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पीक विविधतेचा अवलंब करावा असे आवाहन पंजाबचे फलोत्पादन मंत्री चेतन सिंग जौरमाजरा आणि स्थानिक मंत्री बलकार सिंह यांनी केले. ते म्हणाले की, चांगल्या उत्पादनासाठी आणि अधिक उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी ऊस, कडधान्ये, भाजीपाला यांसह पर्यायी पिके स्वीकारली पाहिजेत. पीक विविधीकरणामुळे केवळ भूजलाची बचत होणार नाही तर जमिनीचे आरोग्यही सुधारेल, असे ते म्हणाले.

संयुक्त बटाटा उत्पादक संघाच्यावतीने (जेपीजीए) करतारपूर धान्य मंडईत आयोजित शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितले की, भात-गहू या दोनच पिकांच्या चक्रापासून दूर राहून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करणे आणि पीक विविधतेचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. सरकार शेतकऱ्यांना नवीन पिकाचे वाण आणि आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करेल. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल.

ते म्हणाले की पंजाबला अशा सुपीक जमिनीचे वरदाम मिळाले आहे, जिथे काहीही पिकवता येते. सुपीक जमीन आणि भूजलाचे संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. मंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांच्या सल्ल्यांचे पालन करण्यास प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती करून देण्याच्या उद्देशाने शेतकरी मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांनी जेपीजीएचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here