पंजाब: ऊस थकबाकी न मिळाल्यास मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

जालंधर : जर ३० ऑगस्टपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी मिळाली नाही तर ५ सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयांना तसेच घराबाहेर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) सदस्यांनी दिला आहे. गुरुद्वारा श्री सुखचैनाना साहिब, फगवाडामध्ये आयोजित एसकेएमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जालंधर-फगवाडा महामार्गावर सुरू असलेले धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत, ३० ऑगस्टपर्यंत, सुरू ठेवण्याची घोषणाही शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान, संघटनांनी लम्पी स्किन डिसीजमुळे (एलएसडी) होणाऱ्या गुरांच्या मृत्यूबद्दलही चिंता व्यक्त केली आणि या रोगामुळे मरण पावलेल्या जनावरांसाठी सरकारने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. नुकसानभरपाईसोबतच आजारी गुरांवर उपचार, भटक्या जनावरांचे लसीकरण आणि त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या इतर मुद्द्यांमध्ये दुधाच्या दरात वाढ आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here