पंजाब सरकारकडून ऊस उत्पादकांची मागणी मान्य; ऊस दरात प्रती क्विंटल ३५ रुपयांची वाढ

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत राज्य समर्थन मूल्य (एसएपी) मध्ये ३५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी मान्य करताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी गळीत हंगाम २०२१-२२ साठी राज्य समर्थन मुल्यामध्ये (एसएपी) ३५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेजारील राज्य हरियाणातील शेतकऱ्यांच्या तुलनेत २ रुपये अधिक म्हणजे प्रती क्विंटल ३६० रुपये मिळतील.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ऊसाचे दर आणि थकबाकीबाबत शेतकरी नेत्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला. मंगळवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक आंदोलनामुळे विस्कळीत झाली होती. पंजाबमधील जालंधर आणि इतर क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रुळांवर आंदोलन करत वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यासह त्या इतर मार्गांनी वळवण्यात आल्या होत्या.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here