पंजाबमध्ये आतापर्यंत पाचट जाळण्याची ९,२४७ प्रकरणे दाखल

चंडीगढ़ : गव्हाच्या पिकापासून तयार होणारी ‘तुरदी’ (सुका चारा) आपल्या पोषण गुणधर्मामुळे जनावरांसाठी सर्वात चांगला मानला जातो. मात्र, पंजाबमधील शेतकऱ्यांनी यावर्षी गव्हाच्या कापणीनंतर पुन्हा एकदा पाचट (पिकाचे शिल्लक अवशेष) जाळण्यास सुरुवात केली आहे. ६ एप्रिलपासून १५ मेअखेर राज्यात ९,२४७ शेतांमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १४,११७ तर २०२१ मध्ये ७,८०८ शेतातील आगींची माहिती मिळाली होती.
पंजाब प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार मोगा जिल्ह्यात (९३२) सर्वाधिक आग लागण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ गुरदासपूर (७७०), अमृतसर (७१०), फिरोजपूर (६८५), लुधियाना (६२४), संगरुर (६१४), भठिंडा (५५९), बर्नाला (५२७), मुक्तसर (५२१), तरनतारन (४१३), फाजिल्का (४१२) , पतीयाळा (३८३), जालंधर (३३४), होशियारपूर (३३२) आणि कपुरथला (२९२) अशी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. रुपनगरमध्ये आगीची सर्वात कमी ११ प्रकरणे नोंद झाली आहेत.

या हंगामात एका दिवसात सर्वाधिक आगीच्या घटना ११ मे रोजी (१,५५४) नोंद झाल्या होत्या. त्यानंतर ६ मे रोजी (१,२२१) १३ मे रोजी (१,११३), १० मे रोजी (१,०१९), ५ मे रोजी (८९२), १२ मे रोजी (७५२) आणि ८ मे रोजी (६०४) आगीच्या घटनांची नोंद झाली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेतकरी गव्हाच अवशेष (पाचट) नव्हे तर त्याच्या मुळावरील भाग जाळत आहेत. चारा तयार झाल्यानंतर पिकाच्या वरील काही सेंटिमीटरचा भाग शेतात सोडून दिला जातो आणि शेतकरी त्याला आग लावतात. या प्रक्रियेत मातीही भाजली जाते. सरकारच्या थोड्या दबावामुळे या आगीपासून सहजपणे बचाव करता येतो. यातून माती, शेतामधील कार्बनिक पदार्थ आणिर मातीशी संलग्न असे अनेक किटकही जाळले जातात. याशिवाय, यातून उच्च प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि ब्लॅक कार्बन निर्माण होण्यासह नायट्रोजन आणि डायम्मोनियम फास्फेट (डीएपी) तसेच पोटॅशियमच्या नुकसानीची शक्यता असते. त्यातून पर्यावरणाचे प्रदूषण अधिक वाढते. आगीमुळे पिकाची उत्पादकता आणि मातीतील खतांचेही अधिक नुकसान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here