पंजाब: संगरुर आणि मलेरकोटला विभागात ऊस लागवड क्षेत्रात घसरण

संगरुर : संगरुर आणि मलेरकोटलामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले मिळण्यास होणाऱ्या उशीरामुळे हे शेतकरी नाईलाजाने पुन्हा भात, गव्हाची शेती करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस क्षेत्रात जवळपास ५६.३ टक्के घटले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०२०-२१ साठी ४०.६९ लाख रुपये थकबाकी धुरी विभागातील खासगी साखर कारखान्यांकडे प्रलंबित आहे. सद्स्थितीत २०२२-२३ मधील १२.८५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी यावर्षी २६.६९ कोटी रुपये किमतीचा ऊस खरेदी केला आहे. आणि शेतकऱ्यांना १३.८४ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या बिलांनुसार धुरी कारखान्याकडे २०२१-२२ साठी जवळपास ३६.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर ३.४६ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत.

ऊस उत्पादक शेतकरी समितीचे अध्यक्ष हरजीत सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना गेल्या वर्षी विक्री केलेल्या ऊसापोटी सर्व बिले देण्यात आली आहेत. नियमानुसार ऊस विक्री केल्यानंतर १४ दिवसांत बिले मिळणे अपेक्षित आहे. ऊस बिले देण्यास होणाऱ्या उशीरामुळे शेतकरी गव्हाच्या शेतीकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षात ऊस शेतीच्या क्षेत्रात घसरण झाली आहे. २०१७-१८ मध्ये ३,८१० हेक्टर, २०१८-१९ मध्ये ३,४६२ हेक्टर आणि नंतरच्या वर्षात २,५५९ हेक्टरपर्यंत ऊस क्षेत्र ङसरले आहे. २०२०-२१ मध्ये ऊस क्षेत्र २,१४३ हेक्टरपर्यंत कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस क्षेत्र ५६.३ टक्के घसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here