पंजाब: ऊस बिलांच्या थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

फगवाडा : हरियाणातील डिफॉल्टर साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करून सरकारला २३.७६ कोटी रुपये मिळाले आहेत. आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर दिली जाईल, असे कॅबिनेट मंत्री कुलदिप सिंह धालीवाल यांनी अमृतसरमध्ये रविवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले. थकीत ऊस बिलांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर थकीत ७२ कोटी रुपये वसुलीच्या मागणीसाठी फगवाडा महामार्गावर आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या २८ दिवसांपासूनचे आपले धरणे मागे घेण्यास अनुमती दिली.

शेतकरी नेत्यांसोबत बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना धालीवाल म्हणाले की, उर्वरीत पैसेही लवकरच वसूल केले जातील. कारखान्याच्या मालकांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगामी ऊस हंगाम नजरेसमोर ठेवून सरकार इतर खासगी कारखान्यांच्या मालकांसोबत फगवाडा कारखाना चालविण्याच्या मुद्यावर चर्चा करीत आहे. धालावील म्हणाले की, जर कारखान्यासाठी योग्य व्यवस्थापन मिळाले नाही, तर राज्य सरकार हा कारखाना चालवेल. फगवाडा येथे मंत्र्यांच्या घोषणेनंतर तत्काळ उर्मरचे आमदार जसवीर सिंह राजा, उप जिल्हाधिकारी सतवंत सिंह, पोलीस अधीक्षक मुख्तियार सिंह यांच्यासह कृषी विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना निर्णयाची माहिती दिली.

आमदारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, कृषी मंत्री एका आठवड्यात मुख्यमंत्री आणि बिकेयू (दोआबा) च्या नेत्यांसोबत १० अथवा ११ सप्टेंबर रोजी थकबाकी व इतर मुद्यांबाबत बैठक घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here