नवांशहर : नवांशहर सहकारी साखर कारखान्याला आम आदमी पक्षाचे हलका विभागाचे प्रमुख ललित मोहन पाठक यांनी भेट दिली. यादरम्यान साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या उसापोटी थकीत १५.९० कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाठक यांनी सांगितले की, साखर कारखान्याने हंगामात १२२ कोटी रुपयांची साखर विक्री केली. यापैकी ७८ कोटी रुपये कारखान्याने ऊस बिलांपोटी आधीच दिले आहेत. गेल्या तीन दिवसांत पंजाब सरकारने साखर कारखान्यांना ऊस बिले देण्यासाठी ७५ कोटी रुपये दिले आहेत. नवाशहर कारखान्याला मिळालेले १५.९० कोटी रुपये त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. त्यामुळे आता कारखान्याकडे ३.१२ कोटी रुपये एवढी थकबाकी राहिली आहे.
थकीत रक्कम लवकरच दिली जाईल, असे सांगण्यात आले. कारखान्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या प्रमुखांनी पंजाब सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी कारखान्याचे जीएम सुरिंदर पाल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सदस्य सरताज सिंह, सोहन सिंह उप्पल, मोहिंदर सिंह राये, हरीपाल सिंह जाडली, चरणजीत सिंह, काश्मीर सिंह, गुरसेवक सिंह, जगतार सिंह, हरिंदर कौर, सुरिंदर कौर, मार्केट कमेटीचे चेअरमन गगन अग्निहोत्री उपस्थित होते.