पंजाब: छाननी समितीकडून ऊस गाळपासह बिलांचा आढावा

फगवाडा : छाननी समितीच्या दुसऱ्या बैठकीत ऊसाच्या गाळपासह शेतकऱ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत करण्यात आलेल्या ऊस बिलांचा आढावा घेण्यात आला. अप्पर उपायुक्त (एडीसी) अरमदिप सिंह थिंड हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सांगितले की, छाननी समितीच्या सदस्यांनी सांगितले की, आतापर्यंत १,०६,५४०० क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापासून ९४,५५१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. २६ डिसेंबरअखेर साखर उतारा ९.४४ टक्के इतका होता.
दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांना ३,५०९.८४ लाख रुपयांच्या ऊस बिलांपैकी गेल्या १५ दिवसांमध्ये १,३६२.३९ लाख रुपयांची बिले देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय, साखर कारखान्यांकडून २२,४९,००० युनिट वीज उत्पादनही करण्यात आले आहे. सर्व उत्पादनांची एकूण किंमत ३९ कोटी ८१ लाख रुपये आहे.

ऊस आयुक्त डॉ. राजेश रहेजा; सहायक आयुक्त सुखजिंदर सिंह बाजवा, सहायक आयुक्त, राज्य कर, दलजीत कौर; सहायक आयुक्त, अबकारी, इंद्रजीत नागपाल, ऊस योजना अधिकारी परमजीत सिंह, ऊस विकास अधिकारी परमजीत सिंह, अमरिक सिंह बुट्टर (उपाध्यक्ष, फगवाडा साखर कारखाना) आणि बिकेयू (दोआबा) चे अध्यक्ष मंजीत सिंह राय, वरिष्ठ उपाध्यक्ष किरपाल सिंह मुसापूर आदी बैठकीस उपस्थित होते. पुढीला आढावा बैठक १७ जानेवारी रोजी होईल असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here