चंदीगढ : पंजाबमध्ये धरणांचे दरवाजे उघडले गेल्याने ऊस शेतामध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पोंग आणि भाखडा या दोन्ही धरणांतील पाणी सोडून दिल्याने हजारो क्यूसेक पाणी गुरूदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, रोपड आणि संगरुरमधील शेतांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे जवळपास १३० गावांतील उभ्या उसाला फटका बसला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन ते तीन दिवसानंतरच पिकांचे किती नुकसान झाले हे समजू शकेल.
याबाबत कृषी संचालक गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, जर पुढील एक ते दोन दिवसात पाणी निघून गेले तर नुकसान कमी होईल. खास करून बासमती आणि ऊस या पिकांमध्ये जादा पाणी साठून राहिले तर मोठे नुकसान होईल. ते म्हणाले की, एकदा पाणी कमी होण्यास सुरुवात झाली तर फिल्डवरील कर्मचारी पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतील. गुरदासपूरमधील ५२ गावे, कपुरथलामधील ३६, रोपडमधील २२, संगरुरमधील १३ आणि होशियारपूरमधील सात गावांना फटका बसला आहे.
या वर्षी जवळपास १.२० लाख हेक्टरमध्ये ऊस आहे. ही ऊस लागवड गेल्या वर्षीइतकेच आहे. खासगी व्यापारी, साखर कारखान्यांकडून ऊस खरेदी केला जातो. ऊस उत्पादकांना राज्य सल्लागार किंमत मिळते. या पिकांचे वाढते क्षेत्र हे पिक वैविध्यिकरणातील AAP च्या प्रयत्नांचा हिस्सा आहे. जर पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला तर त्याचा थेट परिणाम पिक वैविध्यिकरण कार्यक्रमावर होईल. कारण, शेतकरी पाणी जास्त लागणाऱ्या गैर बासमती भाताकडे वळतील अशी शक्यता आहे.