न्यूयॉर्क : यू. एस. शुगर्सने आपल्या स्थानिक प्रतिस्पर्धी लुईस ड्रेफस कंपनीच्या इम्पीरिअल शुगरच्या व्यापारासह मालमत्तेची खरेदी केली आहे. कंपनीने नुकतीच ही घोषणा केली. इम्पीरिअल शुगर्सची जॉर्जियातील सवाना येथे पोर्ट वेनवर्थमध्ये रिफायनरी आहे. लुईस ड्रेफसने २०१२ मध्ये याची ७८ मिलियन डॉलर्सला खरेदी केली होती. यू. एस. शुगर्सकडे जवळपास २,००,००० एकर (८०,९४० हेक्टर) ऊस क्षेत्र आहे. कंपनी फ्लोरीडातील क्लेविस्टनमध्ये एक मोठा कारखाना आणि रिफायनरी चालविते. इम्पीरिअल शुगर मिलच्या खरेदी नंतर कंपनीला आता फायद्याची अपेक्षा आहे. अमेरिकन बाजारात उत्पादन आणि विक्री क्षेत्रात विस्ताराची योजना कंपनीने तयार केली आहे.
लुईस ड्रेफसने सांगितले की, इम्पीरिअल शुगर मिलच्या खरेदीनंतर कंपनीने आता जागतिक साखर व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने अलिकडे साखर उत्पादन व्यवसाय विक्रीसाठी आणखी एका सौद्याची घोषणा केली आहे. मात्र त्याच्या आर्थिक तपशीलाची माहीत कंपनीने दिलेली नाही.