हिंगोली :पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४- २५चा ४४ वा ‘बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी पार पडला. प्रारंभी गळीत हंगाम २०२४-२५ साठीच्या सर्व तयारी बाबतची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनीलराव कदम, संचालक सुरेशराव आहेर, सारदाताई आहेर, संचालक शंकरराव इंगोले, ललिताताई इंगोले, तुकाराम चव्हाण, मनीषाताई चव्हाण, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी आदींची उपस्थिती होती.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनीलराव कदम यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा तसेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सभासदांसमोर मांडला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष कुशहाजीराव देसाई यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासद, ऊसतोड कामगार, कामगार, कर्मचारी आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.