कानपूर येथील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या अनॅलिटीकल हँडबुक फॉर शुगर इंडस्ट्रीचे प्रकाशन खाद्य, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीतील साखर उद्योगाचे वास्तव मांडणारे पुस्तक असल्याचे मनोगत खाद्य तथा ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी व्यक्त केले. केवळ विद्यार्थी नव्हे तर संपूर्ण साखर उद्योगाविषयीचे विविध तांत्रिक पैलूही या पुस्तकातून उलगडत असल्याचे ते म्हणाले.
पुस्तकाचे लेखक, प्रा. नरेंद्र मोहन म्हणाले, सद्यस्थितीत साखर उद्योगातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. सध्याच्या तंत्राची पुरेपूर ओळख यातून मिळते. साखर तसेच अन्य उत्पादनांचे विश्लेषण, गुणवत्ता नियंत्रण यासंबंधीची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. या विषयावर दीर्घकाळानंतर एखाद्या भारतीय लेखकाने लेखन केले आहे.