पीलीभीत : शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शरदकालीन ऊस पेरणी सेमिनार मध्ये खासदार रामसरन वर्मा यांनी शेतकर्यांना सजग करताना सांगितले की, ऊसाच्या पिकामध्ये रेडडॉट नावाचा लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, यावर लवकरच उपाय करणे आवश्यक आहे. उपाय न झाल्यास ऊसाचे संपूर्ण पीक या रोगाच्या अधिपत्याखाली येईल, यामुळे ऊसाचे पीक नष्ट होवून जाईल. खासदार वर्मा, सेमिनारमध्ये ऊस उत्पादकांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, सध्या शेतात पिकलेल्या ऊसावर लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे पीक दिवसेंदिवस खराब होत आहे.
पीकाला वाचवण्यासाठी ऊसाचे पीक कापून जाळून टाकावे, तरच उरलेला ऊस वाचेल. जिल्हा ऊस अधिकारी देवेंद्र कुमार मिश्र म्हणाले, ज्या शेतातल्या ऊसावर लाल किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, ऊस शेतकर्यांनी तो ऊस जाळून टाकावा, तसेच ऊस कापलेल्या जागेवर ब्लीचिंग पावडर टाकावी, जेणेकरुन या रोगाचा प्रादुर्भाव शेतातल्या अन्य ऊसावर होवू नये. वैज्ञानिक प्रवीण कुमार म्हणाले, शेतकर्यांनी ऊस लागवडीपूर्वी ऊसाचे बी शोधूनच आपल्या शेतात ऊस पेरणी ट्रंच पद्धतीने करावी. असे केल्यामुळे पीकात रोगही लागणार नाही आणि पीकही चांगले येईल. कारखान्याचे प्रबंधक एसडी सिंह, ज्येष्ठ ऊस निरीक्षक धमेंद्र दुबे यांनीही सेमिनारमध्ये मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन मनोज त्रिपाठी यांनी केले. यावेळी डायरेक्टर कामता प्रसाद, महीपाल सिंह, रामप्रकाश मिश्र, सत्यपाल यादव आणि ऊस उत्पादक उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.