नवी दिल्ली : केंद्रीय अन्नधान्य मंत्रालयाने २६ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५५५ साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.
गेल्या महिन्याइतकाच कोटा यावेळी मंजूर करण्यात आला आहे. अन्नधान्य मंत्रालयाने एप्रिल २०२१ साठी २१ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर केला होता. तर दुसरीकडे मे २०२० च्या तुलनेत यावेळी जादा साखर कोटा मंजूर केला आहे. सरकारने मे २०२० मध्ये १७ लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या रुग्णसंख्येत गतीने वाढ झाल्याने विविध राज्यांमध्ये लॉकडाउनसारखी स्थिती आहे. त्यामुळे सध्या बाजारावर दबाव पाहायला मिळू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामामुळे कारखानदारांना साखर विक्रीवर ताण सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दरामध्ये स्थिरता आणण्यासाठी मासिक कोटा वितरण पद्धत लागू केली आहे.