मुंबई : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. राज्याच्या अनेक भागात मंगळवारपासून पाऊस सुरूच आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने बुधवारीही अॅलर्ट जारी केला आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्रात भरतीवेळीही इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दुपारी सव्वाचार वाजल्यानंतर भरतीवेळी समुद्रात उंच लाटा उसळतील. त्या ४ मिटरपर्यंत असू शकतात. याशिवाय, रात्री दहा वाजून २३ मिनिटांनंतरही अशीच स्थिती असू शकते. दोन मिटर उंच लाटा उसळू शकतात.
मंगळवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळपर्यंत निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे हा बदल झाला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले की, बुधवारनंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर राहील. १७ आणि १८ जून रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. बुधवारी सकाळीच अनेक भागात पावसानंतर पाणी साठल्याचे दिसून आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link