महाराष्ट्रात पाऊस सुरुच, या जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात जोरदार पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबई हवामान विभागाने मुंबईसह अनेक ठिकाणी बुधवारी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त कली आहे. यादरम्यान ४० ते ५० किमी प्रती तास गतीने हवा वाहील. हवामान विभागाने बुधवारी गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आणि पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर तसेच वर्धामध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी मुंबईसह १५ जिल्ह्यांत यला अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी मंगळवारी मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साठले होते. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता निर्देशांक चांगला ते समाधानकारक श्रेणीत होता. मुंबईत आज बुधवारी कमाल २९ तर किमान २४ तापमान राहील. जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल २६ तर किमान २२ तापमान राहील. नागपूरमध्ये कमाल २९ तर किमान २४ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. नाशिक आणि औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here