महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार दिलासा

महाराष्ट्रातील हवामानात आज बदल झाला आहे. नव्या पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात नागपूरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पावसामुळे तापमान वाढणार नाही. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप ३५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. पावसाचा परिणाम मुंबई, पुण्यात पाहायला मिळू शकतो. या पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिसाला मिळण्याची  शक्यता आहे. आणि तापमानात घसरण होईल. महाराष्ट्रातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात राज्यभर समाधानकारक श्रेणी मिळाली आहे.

मुंबईत आज कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आत ढगाळ वातावरण राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. पुण्यातही कमाल तापमान ३८ आणि किमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये किमान तापमान २३ आणि कमाल ३९ डिग्री राहील. आज ढगाळ वातावरण राहील आणि पाऊसही कोसळू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नाशिक आणि औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here