नवी दिल्ली : संपूर्ण भारतात पुराच्या प्रकोपामुळे यावर्षी 1058 लोकांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी मृत्यूचे प्रमाण 1211 होते. महाराष्ट्रात 245 तर केरळमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला आहे, महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाउस झाल्याने धरणाचे दरवाजे उघडावे लागल्यामुळे इतरही हानी झाली आहे. पुरामुळं मृत्यमुखी पडणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या 2016 मध्ये 936 होती, ती वाढत जावून 2017 मध्ये 1,200 झाली.
यंदा अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पवसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल (154), बिहार (130), गुजरात (107) आणि आसाम व कर्नाटक (94) याठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे.
9 राज्यातील 152 जिल्ह्यांमध्ये 7800 रेस्क्यू कॅम्प ची सोय करण्यात आली होती. सरकारने 101 एनडीआरएफ टीम आणि आर्मी, 6 हेलिकॉप्टर्ससह नेव्ही आणि आयएएफ यांना मदतकार्य आणि पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी तैनात केले होते. केरळमधील किमान 12 जिल्हे संकटात होते. महाराष्ट्रताील 22 जिल्ह्यातल्या तब्बल 7.5 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आणि 305 मदत शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवारा देण्यात आला.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.