बेगुसराय : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम येथेही दिसून आला आहे. हवामानात अचानक बदल झाला आहे. गुरुवारी सकाळपासूनच सतत पाऊस सुरू झाला. वातावरणातील बदलामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. तर तापमानातही घट दिसून आली. किमान तापमान ३९ अंशावरून ३१ अंशापर्यंत घसरले.
या पावसाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचा प्रकार घडला. गढपुरा गावातून राहुलनगरात जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हैसाना रस्त्यावर मुख्य रस्त्यावरही पाणी आहे. याशिवाय प्रखंड मुख्यालयासमोरील सीडीओपी कार्यालयानजिकही पाणी आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामावेळी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण जाली आहे. गढपुराचे सामाजिक कार्यकर्ते नितेश कुमार यांनी सांगितले की, यावेळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून नियमित असेल. अशा स्थितीत गेल्यावेळसारखी पाणी साठणे, पुराची स्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन आणि लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, बंगालच्या खाडीमध्ये आणखी एख यास या नावाचे चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याने पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.