बरेली : उसाच्या लागवडीचे क्षेत्र पाहण्यासाठी सुरू सर्व्हेमध्ये पावसाचे अडथळे येत आहेत. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे कमी मुदत शिल्लक राहीली असताना जिल्ह्यात आतापर्यंत ७८ टक्के सर्व्हे झाला आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत सर्व्हे पूर्ण होणे अशक्य आहे.
सरकारने उसाचा सर्व्हे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला गतीने सर्वेक्षण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे यात अडथळे आले. आता सर्व्हे साठी सात जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे उर्वरीत काम या मुदतीत पूर्ण होईल का याबाबात साशंकता आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व्हे गतीने पूर्ण करावा अशा सूचना सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. पावसामुळे कामात अडथळे येत आहेत, ही वस्तूस्थिती आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link