बेंगलुरु, कर्नाटक: बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्मोण झाल्याने उत्तर कर्नाटकाच्या अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. जोराच्या वाऱ्याबरोबर पाऊस आल्याने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तलाव भरल्याने तलावातील पाणी शेतांमध्ये भरले आहे.
हवामान विभागाचा अंदाज आहे की, पाऊस तीन दिवसांपर्यंत कायम राहील. बीदर, कलबुर्गी, बागलकोट, बेळगाव, हावेरी, कोप्पल, यादगिर, कोप्पल, विजयपुर तथा रायचुरु जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट घेषित केला आहे.
याचुरु जिल्ह्याच्या गजेंद्रगढ व कुष्टगीमध्ये होत असलेल्या पावसामुळे मस्की बंधाऱ्यामध्ये पाणी जोरात वाढत आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी चारही गेटमधून 1600 क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे.
दक्षिण अंदरुनी कर्नाटकच्या रामनगर, बेंगलुरु शहर, बेंगलुरु ग्रमाीण, मैसूर, चामराजनगर, हासन, तुमकूरु जिल्ह्यांमध्ये ही पाऊस होत आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात 140 एमएम पाऊस नोंदवण्यात आला आहे. दावणगिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसामुळे सर्व तलाव भरलेले आहेत आणि त्याचे पाणी आसपासच्या क्षेत्रांमध्ये पसरत आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील तहसील मुख्यालय बेलथंगडी तहसीलमध्ये सर्वात अधिक 148 एमएम पाऊस झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.