महाराष्ट्रात पावसाचा कहर, आयएमडीकडून मुंबईसाठी यलो अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईसाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेने पालघर आणि ठाण्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जनसत्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आज मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची, अतिवृष्टीची शक्यता आहे. प्रती तास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सखल भागात पाणी साचणे, पूरस्थिती आणि भूस्खलनाची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईच्या बहुतांश भागात हलका पाऊस झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी पावसाची तीव्रता कमी होती. शहराच्या बहुतांश भागात हलका पाऊस झाला. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here