‘राजाराम’च्या १८.५ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी १३ महिन्यांत होणार : माजी आमदार महादेवराव महाडिक

कोल्हापूर: येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८.५ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ माजी आमदार, कारखान्याचे संचालक महादेवराव महाडिक यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक, व्हा. चेअरमन गोविंदा चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

मागील वार्षिक सभेमध्ये १८.५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीस सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली होती. त्यानुसार सहवीज प्रकल्प स्थापन करणे, त्याअनुषंगाने मशिनरीचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता ३५०० मे. टनांवरून ४८०० मे. टनांपर्यंत करण्याबाबतचा सुधारित प्रकल्प अहवाल साखर आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. यास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली.

दरम्यान, प्रकल्पासाठी मे. एस.एस. इंजिनिअर्स, पुणे यांची निविदा मंजूर केल्याने हे काम त्यांना दिले आहे. वीज खरेदी करार राज्य वीज वितरण कंपनीबरोबर केला आहे. या प्रकल्पाची उभारणी १३ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले. यावेळी चेअरमन अमल महाडिक, व्हा. चेअरमन गोविंदा चौगुले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, संचालक, सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here