कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना प्रशासनाने ज्या सभासदांनी २०२२ – २०२३ रोजी साखर नेलेली नाही, त्यांना साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत २०२३ – २०२४ सालामध्ये महिन्याला ५ किलोएवजी ६ किलो साखर आणि दिवाळीला सभासदांना तीन किलोएवजी ५ किलो साखर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी दिली.
कारखाना प्रशासनाने प्रशासनाने ज्या सभासदांनी २०२२ – २०२३ रोजी साखर नेलेली नाही, त्यांना साखर न देण्याचा निर्णय नूतन संचालक मंडळाने घेतला होता. त्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. अनेक सभासदांनी साखर देण्याची विनंती केली होती. त्यामुळे संचालक मंडळाने दुसऱ्या मासिक सभेत सभासदांची राहिलेली साखर देण्याबरोबरच मासिक ५ किलो असणारी साखर ६ किलो देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसेच दिवाळीला सभासदांना तीन किलोएवजी ५ किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला.