सांगली : राजारामबापू साखर कारखाना व्यवस्थापनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संपर्क व संवाद ठेवत त्यांच्या सेवेसाठी स्वतंत्र सेल सुरू करावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी केली. कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्ष प्रतीक पाटील अध्यक्षस्थानी होते. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी ३३७ निवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कारखान्याचे प्रतीक पाटील म्हणाले की, आम्ही शेतीवर भर देत असून, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा आदी उपक्रम राबवित आहोत. यावेळी शंकरराव भोसले, निवृत्त कर्मचारी लालासाहेब वाटेगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, राजेंद्र चव्हाण, आटपाडीचे हणमंत देशमुख, बी. डी. पवार, मोहनराव पाटील, तात्यासाहेब थोरात, एच. के. पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत केले. आर. डी. माहुली यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.