राजारामबापू कारखान्यातर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन : उपाध्यक्ष विजयराव पाटील

सांगली : यावर्षी गणेशोत्सवानिमित्त राजारामबापू कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवली जाईल, असा विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केला. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कामगार नेते शंकरराव भोसले यांनी स्वागत केले. मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटील यांनी श्रद्धांजली ठराव, विषय पत्रिका व मागील इतिवृत्ताचे वाचन केले.

करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील म्हणाले की, स्व. बापू, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी निर्माण केलेली दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील पुढे चालवत आहेत. आर. डी. माहुली यांनी यावर्षी दर्जेदार नाटके, ऑर्केस्ट्रा, व्याख्याने, राजारामबापू मॅरेथॉन, कामगारांचा कलाविष्कार, रस्सीखेच, महिलांसाठी गौरी गणपती स्पर्धा, महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी दादासाहेब देशमुख, रंगराव पाटील, अभय पाटील, सदाशिव पाटील, संजय पाटील आदींनी सूचना मांडल्या. जिमखाना समितीचे अध्यक्ष दादासाहेब मोरे, कार्याध्यक्ष. कार्याध्यक्ष आर. डी. माहुली कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खरात, राजेंद्र चव्हाण, डी. एम. पाटील, सुनिल सावंत, प्रशांत पाटील, प्रेमनाथ कमलाकर उपस्थित होते. राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here