सांगली : सांगली जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरुन राज्य शासनाच्या वैध मापनशास्त्र खात्याच्या भरारी पथकाने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल, कारंदवाडी व तिप्पेहळ्ळी (जत) युनिटला अचानक भेट देऊन कारखान्याच्या संगणकीय वजन काट्यांची पडताळणी केली. यानंतर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या चारही युनिटचे वजन काटे अचूक असल्याचा अहवाल वैध मापनशास्त्र खात्याने दिला आहे. यावेळी प्रशासन व पोलीस खात्याचे अधिकारी, तसेच शेतकरी व वाहन मालक उपस्थित होते.
वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक योगेश अग्रवाल यांनी साखराळे, वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी युनिटच्या तर, वैध मापन शास्त्र खात्याचे निरीक्षक उदय कोळी यांनी तिप्पेहळ्ळी- जत युनिटच्या वजन काट्यांची तपासणी केली आहे. त्यांनी प्रथम पोलीस व प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदारांसमोर कारखान्यात ऊस घेऊन आलेली वाहने व रिकाम्या वाहनांच्या वजनाची पडताळणी केली. यामध्ये त्यांना कोणतीही तफावत आढळली नाही. त्यांनी सर्व काटे अचूक असल्याचा कारखान्यास अहवाल दिला आहे.
यावेळी दत्तात्रय माळी, पोलीस हवालदार विलास थोरबोले, वाटेगाव-सुरुल येथे कासेगाव मंडल अधिकारी एस. एस. पटेल, कासेगाव सपोनि भालचंद्र देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील, कारंदवाडी येथे नायब तहसीलदार रमेश रजपूत, आष्टा सपोनि आण्णासोो बाबर, लेखा परीक्षक तातोबा नायकवडी, प्रमोद भिसे, तिप्पेहळ्ळी-जत येथे तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार ए. बी. दोडमाळ, जत सपोनि वैभव मार्कंड, लेखा परीक्षक एम. डी. वझे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित