राजस्थान: साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे बुंदीमध्ये आंदोलन

कोटा : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बंद साखर कारखाना सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुंदी जिल्ह्यातील केशोरायपाटण शहरासह परिसरातील शंभर गावांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात शेकडो लोक गेल्या दोन आठवड्यापासून केशोरायपाटण शहरात आंदोलन करीत आहेत.

आंदोलनकर्त्यांनी गेल्या दोन दशकांपासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. हा कारखाना २००२-०३ पासून बंद आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवर जोर धरला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक १७० एकर जमीन, आवश्यक यंत्रसामग्री, गोडावून, कर्मचारी निवासस्थाने, प्रशासकीय कार्यालय आदी सुविधा उपलब्ध आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यास फक्त देखभाल दुरुस्तीची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

उपलब्ध यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांसह केशोरायपाटणमधील साखर कारखाना देखभाल, दुरुस्तीनंतर ५००० मेट्रीक टन गाळप करू शकतो. त्यासाठी येणारा खर्च २-३ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here