करौली : अवकाळी पावसानंतर एप्रिल महिन्यात तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गव्हाच्या कापणीसही वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण बनले आहे. मजुरांनी आपल्या मजुरीमध्ये १०० रुपयांची वाढ केली आहे. विभागातील अनेक गावांमध्ये सध्या एकाचवेळी गव्हाची कापणी सुरू आहे. यासोबत गव्हाची मळणी सुरू आहे. त्यामुळे गव्हाचे पिक विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी येवू लागली आहे. तर मंडईत पिकाला चांगला दर मिळत नसल्याची स्थिती आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गव्हाच्या खरेदीसाठी कोणत्याही प्रक्रारची प्रक्रिया सुरू झालेली नाही. गावातील लोकांना या कापणी हंगामात रोजगारही मिळाला आहे. गेल्या वर्षी मजुरांना ४०० रुपये दिले जात होते. तर आता ५०० रुपये प्रती दिन मिळत आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले की, बाजारात गव्हाच्या नव्या पिकासाठी २००० ते २१०० रुपये प्रती क्विंटल दर दिला जात आहे. त्यामुळे फारसा नफा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कामगार टंचाईमुळे शेतकऱ्यांना आता शंभर रुपये प्रती दिन जादा द्यावे लागत आहेत.