बायोडिझेलच्या पुरवठ्यासाठी राजपुताना बायोडिझेलला ओएमसींकडून मिळाली ३० कोटी रुपयांची ऑर्डर

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी राजपुताना बायोडिझेल लिमिटेडने बायोडिझेल पुरवठ्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या दोन आघाडीच्या तेल विपणन कंपन्यांकडून लेटर ऑफ इंटेंट (LOI) मिळाल्याची घोषणा केली आहे. इंधन विपणन कंपन्यांनी १३ मार्च २०२५ रोजीच्या इओआय क्रमांक ओएमसी /इओआय / एनयूसीओ / बीडी/ एमएआर २५ (सायकल १) अंतर्गत जारी केलेल्या निविदेला प्रतिसाद म्हणून हे लेटर ऑफ इंटेंट जारी केले होते. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीसाठी एकूण २,००,००० किलोलिटर (केएल) बायोडिझेल खरेदीसाठी ही निविदा होती.

राजपुताना बायोडिझेल लिमिटेड आणि तिची उपकंपनी म्हणजेच निर्वाणराज एनर्जी प्रा. लिमिटेडला एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत एकूण ३,५४३ किलोलिटर बायोडिझेल पुरवण्यासाठी आशयपत्रे मिळाली आहेत. याची अंदाजे ऑर्डर किंमत सुमारे २५.५० कोटी ते ३० कोटी रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, उर्वरित बायोडिझेल पुरवठ्यासाठी एलओआय लवकरच जारी होण्याची अपेक्षा आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेडकडून आयओसीएल आणि बीपीसीएलला आणि निर्वाणराज एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून बीपीसीएलला बायोडिझेल पुरवण्यासाठीच्या बोली तपशीलांची प्रतीक्षा आहे. ती लवकरच प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here