३००० रुपये प्रती टन एफआरपी आणि साखरेच्या एमएसपी वाढीची राजू शेट्टींची मागणी

पुणे : माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सरकारकडून जाहीर केलेल्या किमान समर्थन मुल्याशिवाय २०२१-२२ या ऊस गळीत हंगामासाठी कारखान्यांना विक्री केल्या जाणाऱ्या उसाला अतिरिक्त ४०० रुपये प्रतीटन दरवाढ मागितली आहे. एकूण एफआरपी ३३०० रुपये प्रतीटन देण्याची मागणी शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली. शेट्टी यांनी मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद घेतली. यावेळी दिवाळीपूर्वी २०२०-२१ या ऊस हंगामात शेतकऱ्यांना अंतिम हप्त्याच्या स्वरुपात १५० रुपये प्रतीटन देण्याची मागणी करण्यात आली.

ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या एका मोठ्या मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी साखरेच्या वधारलेल्या दरावर दृष्टिक्षेप टाकला. त्यामुळे साखर कारखानदार सहजपणे शेतकऱ्यांना १० टक्के रिकव्हरीवर सरकारने जाहीर केलेली २९०० रुपये प्रती टन एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊ शकतात असे ते म्हणाले. जे कारखाने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देण्यास अपयशी ठरली आहेत, अशा कारखानदारांना शेट्टी यांनी इशारा दिला. नवा हंगाम सुरू करण्यापूर्वी या कारखान्यांनी १५ टक्के व्याजासह थकीत रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, पैसे देण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांना सरकारने गाळप परवाना देऊ नये. जर अशा कारखान्यांना परवाना दिला गेला तर आम्ही त्या कारखान्यांचे गाळप बंद पाडू. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरवाढीमुळे इथेनॉलच्या दरातही दहा रुपयांची वाढ केली जावी अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here