वसंतदादा कारखान्यासमोर राजू शेट्टींचा ठिय्या, एफआरपीच्या मुद्यावर ठाम

सांगली : दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे. दत्त इंडिया कारखान्याकडून एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यासमोरुन हलणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यात ऊस दराची कोंडी न फुटण्यामागे माजी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम हे झारीतले शुक्राचार्य आहेत असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र दत्त इंडिया दर जाहीर करण्यास तयार असताना जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांचा त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे दत्त इंडिया कारखान्यावर संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दत्त इंडिया कारखान्याने गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचे १०० रुपये आणि एफआरपी अधिक १०० रुपये असा दर जाहीर करावा, तेव्हाच कारखान्यासमोरील आंदोलन मागे घेऊ, असे शेट्टी यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. याबाबच कारखानादारांच्या अध्यक्षांच्या बैठकीचे पत्र मिरज प्राताधिकाऱ्यांनी शेट्टी यांना दिले. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला दर द्यावा असे ते म्हणाले. दरम्यान, कारखान्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न स्वाभिमिनीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांना पोलिसांनी रोखले. कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here