युपी : १५ ऑगस्ट रोजी राकेश टिकैत करणार ट्रॅक्टर क्रांती आंदोलन

बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेतून येणाऱ्या सफरचंदावर सरकारने २० टक्क्यांनी कर घटवला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ट्रॅक्टर क्रांती आंदोलन केले जाईल. त्याची योजना १७ जुलै रोजी ठरवली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बागपतमधील दादरी गावात टिकैत यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बागपतमध्ये प्रलंबित असलेले प्रश्न मांडले. शेतकऱ्यांना ऊस पिकाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. कारखानदारांनी बिले थकवली आहेत. सरकार १० वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करीत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे त्यांनी सांगितले. बागपतमधील मलकपूर साखर कारखान्याकडे ४५० कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेवून एक दिवस मोदीनगरमध्ये आंदोलन करून कारखाना बंद पाडावा. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here