थकीत बिले देण्याची रालोद आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शामली : रालोदचे आमदार प्रसन्न चौधरी, थानाभवनचे आमदार अश्रफ अली खान यांनी जिल्हाधिकारी रविंद्र सिंह यांची भेट घेतली. शामली सदरचे आमदार प्रसन्न चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील शामली, थानाभवन आणि ऊन या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवल्याचा प्रश्न मांडला.

लाईव्ह हिंदूस्थामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील या तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस बिले थकवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या प्रश्नात लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बिले देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदारांनी केली. आमदारांनी यावेळी ऊस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here