रमजान साखर कारखाना भ्रष्टाचार: पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मोठा दिलासा

लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना २०१९ मधील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अकाउंटॅब्लिटी कोर्टाने या प्रकरणी पुढील कारवाई स्थगित केली आहे. नॅशनल अकाउंटॅब्लिटी ब्युरोने (एनएबी) २०१९ मध्ये शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण नोंदवले होते. शहबाज यांनी पंजाबचे मुख्यमंत्री असताना आपल्या कार्यकाळात अधिकाराचा दुरुपयोग केला आणि मुलाच्या मालकीच्या रमजान साखर कारखान्यामध्ये सुविधांसाठी चिनियट जिल्ह्यात १० किलोमीटर स्लज कॅरियरची निर्मिती केल्याचा आरोप एनएबीने केला होता. NAB ने म्हटले होते की, या निर्णयामुळे राष्ट्रीय खजान्याचे PKR २१.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंतप्रधान शहबाज यांचे वकील अमजद परवेज यांनी सांगितले की, पंतप्रधान शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्याविरोधातील रमजान साखर कारखान्याचा हा खटला बंद करण्यात आला आहे. कारण संसदेने मंजूर केलेल्या एनएबी कायद्यातील सुधारणेनंतर हे प्रकरण अकाउंटॅब्लिटी कोर्टाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. ते म्हणाले की, बुधवारी लाहोरच्या अकाउंटॅब्लिटी कोर्टाने शहबाज आणि हमजा यांच्या विरोधातील रमजान साखर कारखान्याच्या प्रकरणाची कारवाई रोखली आहे. आणि हे प्रकरण एनएबीकडे पाठवले आहे. परवेज म्हणाले की, सुधारित एनएबी कायद्यानुसार, पीकेआर ५० कोटी पेक्षा कमी रक्कमेच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण अकाउंटॅब्लिटी कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही. आणि या प्रकरणात शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप पीकेआर २० कोटींपेक्षा थोडे अधिक आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोप केला की, शहबाज सरकारने केवळ स्वतःचे कुटुंब आणि इतर राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी एनएबीच्या कायद्यात बदल केले आहेत. खान यांनी या सुधारणांना कोर्टात आव्हान दिले आहे. बुधवारी पंतप्रधान शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांनी त्यांच्या विरोधातील आणखी एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून सुटका करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here