इराणमध्ये साखरेच्या दरात गतीने वाढ

तेहराण : इराणमध्ये साखरेच्या दरात गतीने वाढ होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. राजधानी तेहरानच्या काही भागातील दुकानांमध्ये तर साखर उपलब्ध नाही. तेहरानच्या दोन जिल्ह्यांमध्ये लोकांना साखर मिलतच नाही. तर शहराच्या उत्तर भागात ग्राहकांना साखरेसाठी जादा किंमत मोजावी लागत आहे.

सरकारने गेल्या महिन्यात साखरेच्या दरात वाढ केली. पूर्वी साखरेसाठी पारंपरिक पद्धतीने अनुदान दिले जात होते. वाढती बेरोजगारी आणि कामगारांना वेळेवर वेतन देण्यास कंपन्या असमर्थ ठरल्याने खाद्यपदार्थांच्या किमती एका वर्षात ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

देशातील बहुतांश मोठे व्यवसाय सरकार आणि त्यांच्या विविध संस्थांच्या स्वामित्वाखाली आहेत. अलीकडेच काही आठवडे नागरिकांनी आंदोलने आणि निदर्शने केली आहेत. कामगारांनी वाढत्या महागाईचा सामना करताना पगारवाढीची मागणी केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here