ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा गतीने फैलाव

बरेली : पाऊस न झाल्याने ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा गतीने फैलाव सुरू आहे. सद्यस्थितीत शेतांमधील कोएस ०२३८ या प्रजातीच्या उसाला सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मिरगंज परिसरात याच प्रजातीच्या उसाची लागण अधिक झाली आहे. ऊस विभाग तसेच डीएसएम शुगर मिलीकडून याबाबत शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करनपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी जबर पाल सिंह यांनी सांगितले की, या रोगाचा प्रादुर्भाव तीन टप्प्यांमध्ये दिसतो. डीएसएम शुगर मिलचे ऊस अधिकारी नवल किशोर गंगवार यांनी सांगितले की, पोक्का बोईंगचा फटका ५० टक्के शेतांमध्ये दिसून येत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

ऊस विभागाचे पर्यवेक्षक चंद्रसेन गंगवार, सहकारी ऊस विकास समितीचे जितेंद्र सिंह यांनीही शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना सुरू करण्यास सांगितले आहे. पोक्का बोईंगचा फैलाव रोखण्याचे आवाहन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here