मंदीच्या तडाख्यातून सावरण्याचा RBI ला विश्वास, गतीने वाढणार अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था खराब जागतिक परिस्थितीनंतरही लवचिक बनली असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, जागतिक मंदिच्या शक्यतेदरम्यान आपण जगातील सर्वात गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहोत. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडला आहे. त्यातून विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. पश्चिम-दक्षिण मान्सून परतल्याने ग्रामीण मागणीत लवकरच सुधारणा होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरबीआयने म्हटले आहे की, जागतिक मंदिच्या भीतीच्या दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था गतीने वाढेल असे संकेत मिळत आहेत.

आजतकने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, आरबीआयने यासाठी काहीच कालमर्यादा सांगितली नसल्याचे बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, पुरवठा साखळीवरील दबाव कमी होण्यासह कमोडिटीच्या किमती जर घसरल्या तर उच्च महागाईचा वाईट काळ संपुष्टात येईल. देशातील घाऊक महागाईचा दर गेल्या सहा महिन्यांपासून ७ टक्क्यांच्या वर आहे. आरबीआयच्या निकषापेक्षा हा दर अधिक आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचाही प्रभाव पडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. जर कच्चे तेल १०५ डॉलर प्रती बॅरलवर राहिले तर सीएडी जीडीपी २.३ टक्के वाढेल. मात्र, कच्च्या तेलाचे दर आणखी भडकले तर सीएडी जीडीपी आणखी कमी वाढ होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here