भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. तीन दिवसीय एमपीसी बैठकीनंतर निष्कर्ष मांडताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेट स्थिर ठेवण्याची घोषणा झाली. यामध्ये हा दर ६.५० टक्के जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २५ बेसिस पॉईंटची वाढ होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीत हा दर स्थिर करण्याचा निर्णय झाला आहे. मे २०२२ पासून रेपो रेट सलग सहा वेळा वाढला आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयने नव्या आर्थिक वर्षात एमपीसीची बैठक तीन एप्रिलपासून सुरू केली होती. आणि यामध्ये जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. देसात किरकोळ महागाईचा दर जानेवारीत ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीत ६.४४ टक्के दर आहे. हा महागाईचा आकडा २-६ टक्क्याच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट आरबीआयचे आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढीची शक्यता आहे. शक्तीकांत दास यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गरज भासेल तर पुढील निर्णय घेतला जाईल. एमपीसीच्या बैठकीत व्याज दर ६.५० टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.