लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाच बड्या थकबाकीदार साखर कारखान्यांविरोधात वसुली प्रमाणपत्र (आरसी) जारी करण्यात आले आहे.
राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, वारंवार सांगूनही शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यास उशीर करणाऱ्या पाच मोठ्या थकबाकीदार साखर कारखान्यांविरोधात वसूली प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. ऊस बिलांचा दररोज आढावा घेतला जात आहे. या पाचही कारखान्यांनी टाळाटाळ केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भूसरेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी समुहाचा मलकपूर साखर कारखाना, बागपत, साखर कारखाना गडौरा-महराजगंज, सिंभावली समुहाचा साखर कारखाना चिलवरीया – बहराईच, बजाज समुहाचा इटई मैदा-बलपामपूर आणि यदू समुहाचा बिलौली-बदायू साखर कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा प्रशासन साखर कारखान्याकडून जमीन विक्रीसह सर्व पर्यायांतून पैसे वसुली करेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जातील.
ऊस आयुक्तांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या १२० साखर कारखान्यांपैकी ३६ कारखान्यांनी शंभर टक्के, २९ कारखान्यांनी ८० टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. तर १९ कारखान्यांनी ९० टक्के पैसे थकवले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link