सहारनपूर : ऊस थकबाकी देण्यात पिछाडीवर असलेल्या साखर कारखान्यांविरोधात कडक कारवाई सुरू झाली आहे. ऊस आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्वाधिक थकबाकीदार असलेल्या गांगनौली साखर कारखान्याला आरसी नोटीस जारी केली आहे. कारखान्याकडे एकूण १८२.७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी १६२.२४ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. तर उर्वरित थकबाकीवरील व्याज, ऊस खरेदीवरील अंशदान, त्याचे व्याज यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांपैकी देवबंद आणि शेरमऊ या दोनच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण बिले अदा केली आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, खासगी क्षेत्रातील गांगलहेडी व सहकारी क्षेत्रातील नानौता तथा सरसावा कारखान्यावर २७२.४६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी राज्याचे ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांना ऊस बिले देण्यात पिछाडीवर असलेल्या गांगनौली आणि गागलहेडी कारखान्यांना वसुलीसाठी आरसी नोटीस जारी करण्यास सांगितले होते. ऊस आयुक्तांनी गांगनौली साखर कारखान्याने वसुली प्रमाणपत्र जारी केले आहे. कारखान्याकडून वसुली केली जाईल असे देवबंदचे उप जिल्हाधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. तर जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, याबाबत कारवाईचा प्रस्ताव ऊस आयुक्तांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. .