पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा गळीत हंगामाला सुरुवात 15 नोवेंबरपासून प्रारंभ होणार आहे. . त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी दाखल होऊन झोपड्या (राहुट्या) उभारणीचे काम सुरू केले आहे. ऊस तोडणी हंगाम सुरू होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रक व ट्रॅक्टर एक आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यात गेले होते.
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दिवाळीपूर्वी कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात दाखल होऊ लागल्या आहेत. गावोगावी नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील आगारावर बहुधा अनेक ऊस कारखान्यांची कमान अवलंबून असल्याने जादा टोळ्या या परिसरात दाखल झाल्या आहेत. नीरा भीमा कारखाना (शहाजीनगर), कर्मयोगी शंकरराव पाटील (बिजवडी), सहकारमहर्षी शंकरराव मोहिते (शंकरनगर), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर), विठ्ठलराव शिंदे कारखाना (गंगामाईनगर), भैरवनाथ शुगर (आलेगाव), बारामती अॅग्रो (शेटफळगढे), छत्रपती कारखाना (भवानीनगर) आदींच्या मजूर टोळ्या दाखल झाल्या आहेत.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.