नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोना संक्रमणाचे 24,712 नवे रुग्ण समोर आले आहेत. यानंतर आता देशामध्ये आतापर्यंत संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 1,01,23,778 इतकी झाली आहे आणि यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 96.93 लाख झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, संक्रमाणामुळे 312 रुग्णांचा मृत्यु झाल्यानंतर मृतांची संख्या वाढून 1,46,756 झाली आहे. देशामध्ये संक्रमणमुक्त झालेल्या लोकांची संख्या वाढून 96,93,173 झाली आहे, अर्थात संक्रमित झाल्यानंतर लोकांचा बरे होण्याचा दर 95.75 टक्के आहे, तर मृत्युदर 1.45 टक्के आहे.
कोविड 19 मुळे संक्रमित उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या सलग तिसर्या दिवशी तीन लाखापेक्षा खाली राहिली. आकड्यांनुसार देशामध्ये कोरोनामुळे संक्रमित झालेल्या 2,83,849 रुग्णांवर उपचार सुरु आहे.