बिजनौर, उत्तर प्रदेश: जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरु करण्याची तयारी चालू झाली आहे. साखर कारखान्यांनी गाळप हंगामापूर्वी आपल्या खरेदी केंद्रांवर वजन काटे लावणे सुरु केल आहे. धामपूर साखर कारखान्याने 63 आणि स्योहारा साखर कारखान्याने आतापर्यंत 25 वजन काटे लावले आहेत.
जिल्ह्यामध्ये 9 साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील काही साखर कारखाने ऑक्टोबरचा अखेरचा आठवडा आणि इतर साखर कारखाने नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरु होतील. साखर कारखान्यांनी हंगाम सुरु होण्यापूर्वी खरेदी केंद्रांवर वजन काटे लावणे चालू केले आहे. धामपूर साखर कारखान्याने 208 खरेदी केंद्रांपैकी 63 आणि स्योहारा साखर कारखान्याने 25 खरेदी केंद्रांवर आतापर्यंत वजन काटे लावले आहेत. दोन्ही साखर कारखाने लवकरच आपल्या सर्व खरेदी केंद्रांवर वजन काटे लावतील. डीसीओ यशपाल सिंह यांनी सांगितले की, बहादरपुर साखर कारखान्याने 1 वजन काटा लावला आहे. बुंदकी साखर कारखानाही एक दोन दिवसात खरेदी केंद्रांवर वजन काटे लावण्याचे काम सुरु करेल. नजीबाबाद साखर कारखाना 36 खरेदी केंद्रांमध्ये वजन काटे लावण्याचे काम 5 ऑक्टोबरपासून सुरु करेल. बरकातपूर, बिजनौर साखर कारखाना, चांदपुर साखर कारखानाही लवकरच वजन काटे लावण्यास सुरुवात करेल.
बिजनौर चे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखाने ऑक्टोबर च्या अखेरच्या आठवड्यात सुरु होतील. काही साखर कारखाने नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरु होतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.