नवी दिल्ली : चीनी मंडी
जागतिक बाजारात तेलाच्या दरांची घसरण सुरुच आहे. या आठवड्यात तेलाचेदर गेल्या वर्षभरातील निचांकी पातळीवर पोहोचले. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीने तेलाचे दर खाली आले असून, आता बाजारपेठेत अतिरिक्त पुरवठ्याची भीती व्यक्त होत आहे.
मुळात तेलाचे दर असे अचानक खाली घसरण्याला अनेक कारणे आहेत. कच्च्या तेलाचा वाढता साठा आणि शेल उत्पादन वाढल्यामुळे तेलाच्या किमतींवर दबाव वाढला. पण, प्रत्यक्षात मोठ्याप्रमाणवर विक्री होऊ लागल्याने किमती खाली आल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतील ‘गेनस्केप’ संस्थेच्या म्हणण्यानुसार तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यामुळे मागणी मंदावण्याची भीती होती. पण, त्याचवेळी पुरवठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली.
विशेष म्हणजे, घसरणीची टक्केवारी ही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे, हे स्पष्ट होत आहे, असे मत शिकागोमधील प्राइस फ्युचर ग्रुपचे फिल फायन्न यांनी व्यक्त केले आहे. बाजारपेठेत अजूनही त्याबाबत अस्वस्थता असल्याचे फिल यांनी सांगितले.
या आठवड्यात सोमवारी कच्च्या तेलाचे दर ४ टक्क्यांनी घसरले आणि जवळपास तेवढ्याच फरकाने मंगळवारीही कोसळले. डब्लूटीआय प्रति बॅरल ४८ डॉलरच्या खाली घसरले तर ब्रेंट ५८ डॉलरच्या खाली आले. दी ईआयएच्या ताज्या अहवालानुसार अमेरिकेतील शेल उत्पादन उच्चांकी पातळीवर होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी रोज ८१ लाख बॅरल उत्पादन होईल. महिन्याच्या सरासरीत रोज एक लाख ३४ हजार बॅरलची वाढ होणार असल्याचे दिसत आहे. पुढच्या महिन्यापासून परमेएनचे उत्पादन रोज ७३ हजारने वाढणार आहे.
जर डब्लूटीआयचा दर प्रति बॅरल ५० डॉलरच्या खाली राहिला तर, आता तेल उत्खनन कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करू लागतील. स्कॉटिआबँकेतील कमॉडिटी स्ट्रॅटेजिस्ट असलेले मायकेल लोवेन म्हणाले, ‘अमेरिकेमध्ये आता पुरवठा कमी झाल्याचे पहायला मिळणार आहे. यावर तेल उत्पादन प्रतिक्रया देतील, असे वाटत नाही. पण, तेलाच्या बाजारपेठेतील निराशाजनक स्थितीमुळे जागतिक अर्थव्यस्थेतील घसरणीमध्ये असलेल्या भीतीला आणखी बळ मिळू शकते.’
अमेरिकेतील भांडवली बाजारात सोमवारी घसरण झाली, तिच घसरण आशिया खंडातील बाजारांमध्ये आपल्याला पहायला मिळाली. अमेरिकेत दी फेडरल रिझर्व्हकडून या आठवड्यात व्याजदर वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जे महाग होतील आणि त्याचा डॉलरच्या मजबुतीला फायदा होईल. नव्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी काही देशांमध्ये भांडवली वाद सुरू करण्याचा अमेरिकेचा यामागचा कट आहे.
अमेरिका डॉलर मजबूत करण्यासाठी धडपडत असली तरी जगातील मोठी बाजारपेठ असलेल्या आशिया खंडात वाहनांची विक्री घटली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्री बाजारावर झालेला दिसत आहे. येत्या दोन आठवड्यांत भांडवली बाजारातील स्थिती सुधारली नाही तर, भविष्यात स्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. या वर्षी पहिल्या सहा महिन्यात बाजारात झालेल्या चढ उतारांमुळे २००८ नंतर अमेरिकेसाठी २०१८ हे सर्वांत नुकसान देणारे वर्ष ठरले आहे.
येत्या २०१९मध्ये अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या मंदिमुळे तेलाची मागणी घसरण्याची शक्यता आहे. बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांनी काही दिवसांपूर्वीच उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, त्यांच्यासाठी हा काळ दुदैवाचा मानला जात आहे.
जागतिक मंदीमुळे या देशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तेलाच्या बाजारपेठेतील स्थैर्य ही बाब आता इतिहासजमा झाली आहे आणि तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्याचा परिणामही फारसा दिसून आलेला नाही, असे मत कॉमर्सबँकेकडून व्यक्त करण्यात आले आहे.